श्रीगोंदा /विसापूर : पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ललित पांडुळे यांच्या नेतृत्वाखाली बेलवंडी पोलिसांनी बुधवारी रात्री विसापूर परिसरात कोंबिंग आॅपरेशन राबवत सात दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केले.लंगड्या अंकुश काळे (वय ४५), अशोक आळशीराम काळे (वय ४२), पिन्या अंकुश काळे (वय २५), जयश्र्या अंकुश काळे (वय ५०), निमकर अर्जुन काळे (वय २०, सर्व रा़ रांजनगाव मशिद, ता़ पारनेर), अविनाश रमेश काळे (वय २२, रा़ मोहरवाडी, कोळगाव), छत्रुगन त्रिंबक भोसले (वय ४२, रा़ निमगाव खलू) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य तसेच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिसांनी पकडली दरोडेखोरांची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 10:50 IST