शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांच्या निनादात नगरमध्ये गणेश विसर्जन; डीजेसाठी नऊ मंडळाचा मिरवणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:00 IST

गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्यामुळे गेल्या २५ वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डीजेबंदीमुळे पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.

अहमदनगर : गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्यामुळे गेल्या २५ वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डीजेबंदीमुळे पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. सहा मंडळांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेश मुर्तींचे विसर्जन केले तर मानाच्या गणेश विशाल गणपतीसह इतर काही मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी बारापर्यंत चालणारी मिरवणूक यंदा नऊ वाजताच संपली.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी केली होती. मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, असा अट्टहास पोलिसांकडे धरला होता. पोलिसांनी नकार दिल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. मिरवणुकीत विशाल गणपती, महालक्ष्मी, कपिलेश्वर दोस्ती, आदिनाथ व आनंद तरुण मंडळ हे सहभागी झाले होते. नवरत्न, समझोता, निलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ यांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेशमुर्तींचे विसर्जन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सहा मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करत नऊ वाजेपर्यंत गणेशमुर्तीचे विसर्जन केले. दरम्यान सावेडी येथील तीन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

विशाल गणपतीची मिरवणूक लक्षवेधी

नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीची मिरवणूक यंदाही नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेद यांच्या हस्ते पुजा होऊन विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. लेझीम ढोल, ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणरायाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हा मिरवणूक सोहळा रंगला. सात वाजेच्या दरम्यान विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Visarjanगणेश विसर्जन