शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या अनिल विलास वाल्हेकर (वय २३, रा. शेवगाव) याचा नदीच्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला. नदीच्या पुलावर जेथे विसर्जन करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. तेथे विसर्जन न करता वेगळ्या रस्त्याने जाऊन अनिल नदीमध्ये विसर्जन करीत होता. यावेळी त्याचा पाय घसरुन तो पडला. तो बुडल्यानंतर त्याला विसर्जन स्थळावरील कर्मचाºयांनी वाचविण्याचे प्रयत्न केले. त्याला पाण्याबाहेर काढले. त्यास रुग्णालयात दाखल केले असता त्याच उपचारापूर्वीच निधन झाले.
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 13:15 IST