शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Ganesh Festival 2018 : ५०० गावांत एक गाव एक गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 13:58 IST

पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात यंदा ५०० गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१२३५ मंडळांना परवानगी: उत्सव काळात ४ हजार पोलीस बळ तैनात

अहमदनगर : पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात यंदा ५०० गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. एकूण १२३५ मंडळांना सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे. यंदा गणेशोत्सव व मोहरम सण एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोहरम उत्सव व गणेश मंडळांना परवाना घेणे बंधनकारक केले आहे. प्रशासनाकडे परवानगीसाठी एकूण १२७९ मंडळांनी अर्ज केले होते़ यातील १४ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली असून, ३० मंडळांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत़ श्रींची प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उत्सव काळात काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दहा दिवस प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी, शांतता समितीचा सदस्य, पोलीस मित्र व मंडळाचा एक स्वयंसेवकांची समिती नेमण्यात आली आहे़ सायंकाळी आरतीच्या दरम्यान या समिती सदस्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी गणेश विसर्जनाची मोठी मिरवणूक निघते त्या ठिकाणी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे़ तसेच प्रत्येक मंडळासोबत पोलीस फौजफाटा तैनात राणार आहे.असा राहणार पोलिसांचा फौजफाटाजिल्ह्यातील २ हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या १५ प्लाटून, १००० होमगार्ड यासह बाहेरील जिल्ह्यातून २५ अधिकारी व पोलीस बळाची मागणी करण्यात आली आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव व मोहरम शांततेत साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे़ गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ बाहेर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले आहे़ कुठे अनुचित प्रकार निदर्शनास आला तर जनतेने तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८