शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी बानकरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:37 IST

शनिशिंगणापूर येथील बहुचर्चित गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह त्याचा साथीदार गणेश सोनवणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली.

अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील बहुचर्चित गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह त्याचा साथीदार गणेश सोनवणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली.शनिशिंगणापूर येथे २० डिसेंबर रोजी जुन्या वादातून बानकर गँगने भुतकर याच्यावर तलवार व कु-हाडीने वार करून त्याची हत्या केली होती. याप्रकरणी मयत गणेश याचा भाऊ रामेश्वर याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात आधी पाच आरोपींना अटक केली आहे. मुख्य मारेकरी बानकर मात्र गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. बानकर व त्याचा साथीदार सोनवणे हा मुंबई लपला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. पथकाने सात ते आठ दिवस मुंबईत बानकर याचा शोध घेतला. अखेर शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. घटना घडल्यापासून बानकर फरार होता. तो एका ठिकाणी राहत नव्हता त्यामुळे पोलीसांनाही त्याच्या ठिकाणाचा अंदाज येत नव्हता. तो काही दिवस तामीळनाडू राज्यात विविध ठिकाणी राहत होता. मुंबईत येताच स्थानिक गुन्हे शाखेला त्याची खबर मिळाली आणि तो गजाआड झाला.  स्थानिक गुन्ह शाखेने याआधी पंकज बानकर, अर्जुन महाले, बाळासाहेब हरकळ, लखन उर्फ लक्ष्मण नामदेव ढगे यांना अटक केली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर