शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गणेश आरतीवर होणार भरतनाट्यम् : १०० मुली धरणार ताल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:53 IST

श्री गणेशाला कलेची देवता म्हणतात़ म्हणूनच गणेशोत्सव काळात विविध कलांचा संगम पहायला मिळतो. असाच कलेचा अनोखा संगम नगरमधील श्री विशाल गणेश मंदिरात शुक्रवारी (दि़. १४) नगरकरांना पहायला मिळणार आहे़ तब्बल १०० मुली गणेश आरतीवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.

अहमदनगर : श्री गणेशाला कलेची देवता म्हणतात़ म्हणूनच गणेशोत्सव काळात विविध कलांचा संगम पहायला मिळतो. असाच कलेचा अनोखा संगम नगरमधील श्री विशाल गणेश मंदिरात शुक्रवारी (दि़. १४) नगरकरांना पहायला मिळणार आहे़ तब्बल १०० मुली गणेश आरतीवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.गुरुवारी (दि़ १३) घरोघरी श्री गणेशाचे आगमन होत आहे. सार्वत्रिक गणेशोत्सवाचीही जोरदार तयारी सुरु आहे़ गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ नगर शहराचे आराध्य दैवत माळीवाडा येथील श्री गणेश मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी १० वाजता सुमारे १०० मुली एकाच वेळी भरतनाट्यम्चे सादरीकरण करणार आहेत़ या सादरीकरणामध्ये ‘सुखकर्ता दुखहर्ता’ या आरतीने सुरुवात करुन ‘प्रणम्य शिरसां देवम्, ‘गणेश कौतुकम्’, ‘शिवकिर्तन’, ‘महिषासूर मर्दिनी स्तुती’ अशा विविध नृत्य प्रकाराचा समावेश आहे, अशी माहिती नृत्यप्रशिक्षिका सुरेखा डावरे यांनी दिली़ अहमदनगर शहरामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकाचवेळी विद्यार्थिनी शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर