शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘गांधी साहब अमर रहे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीतील मोक्षधाम विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा ...

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीतील मोक्षधाम विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गांधी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. नगर शहरातील बाजारपेठेतून बंद रुग्णवाहिकेतून त्यांची अंत्ययात्रा

काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्ते शोकाकुल झाले होते.

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले होते. राज्य शासनाच्या विशेष परवानगीने त्यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी ४ वाजता रुग्णवाहिकेद्वारे नगरमध्ये आणण्यात आले. बुरूडगाव रोडवरील त्यांच्या निवासस्थानी रुग्णवाहिका आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीय, नातेवाइकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि लगेच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रुग्णवाहिकेत बंदपेटीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाला भाजपच्या झेंड्याने लपेटण्यात आले होते.

अंत्ययात्रेत नगर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले होते. लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेताना अनेकांचे डोळे पाणावले. सामाजिक अंतर राखण्याचे, मास्क लावण्याचे पोलीस ध्वनिक्षेपकाहून आवाहन करत होते. अंत्ययात्रेत गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंत्ययात्रेच्या अग्रभागी सुवेंद्र गांधी होते. त्यांच्यासमवेत शिवसेना- भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक होते.

--------

ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

गांधी यांचे निवासस्थान, आनंदधाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट यार्ड चौक, बंगाल चौकी, चर्च रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेताजी सुभाष चौक, लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय, आनंदी बाजार, नालेगावमार्गे अंत्ययात्रा नालेगावमध्ये पोहोचली. अंत्ययात्रेदरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अर्बन बँक अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही त्यांना पुष्पचक्रे वाहिली. अंत्ययात्रा भाजप कार्यालयाजवळ आल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी, शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यालयाच्या इमारतीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली.

---------

मोक्षधाम विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार

नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीतील मोक्षधाम विद्युतदाहिनीत दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र देवेंद्र व सुवेंद्र यांनी विधी पार पाडले. त्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार नीलेश लंके, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

---------------

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

न झाल्याने मुलगी संतापली

दिलीप गांधी हे माजी केंद्रीय राज्यमंत्री, तीन वेळा खासदार होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वजही वाहला नाही, तसेच बंदुकीच्या फैरी झाडून सलामीही देण्यात आली नाही. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाहीत, असा सवाल दिवंगत दिलीप गांधी यांच्या कन्या स्मिता नवसारीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. यावेळी अधिकारीही निरुत्तर झाले.

-------------