शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जातेगावमध्ये एक गणपती; श्रीरामपुरमध्ये चिमुकल्यांनी धरला लेझीमवर ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 14:29 IST

सुपा/ श्रीरामपूर : पारनेर तालुक्यातील नगर पुणे रोडवरील जातेगावकरांनी ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवली असून ...

सुपा/ श्रीरामपूर : पारनेर तालुक्यातील नगर पुणे रोडवरील जातेगावकरांनी ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवली असून गावच्या मारुती मंदिरातील सभामंडपात गणेश मूतीर्ची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वर्षी गावात दैनिक लोकमत आयोजित ‘ती’ चा गणपती उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वर्षी पहिल्यांदा पुजेचा मान महिलेला देऊन त्यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठपणा करून आरती होणार आहे. स्त्रीला गौरी, दुर्गा, आदिशक्ती म्हणून संबोधतो़ परंतु उत्सवात मात्र ‘ती’ला बाजूला ठेवण्याची परंपरा थांबवण्यासाठी ‘लोकमत’ने सुरु केलेला ‘ती’चा गणपती उपक्रम जातेगावकरांनी हाती घेतला आहे.

गावातील जेष्ठ नागरिक व तरुण यांच्या प्रयत्नातून एक गाव एक गणपती द्वारे गावात एकोपा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.या उत्सवाचा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच महिला माताभगीणीसाठी कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवासाठी विशाल फटांगडे, संतोष ढोरमले, अविनाश ढोरमले, संदीप औटी, मुन्ना पठाण, लक्षमण औटी, विजय ज-हाड, ज्ञानदेव पोटघन, बन्शी ढोरमले यांच्यासह युवक प्रयत्नशील आहेत.श्रीरामपूर येथील नवीन मराठी शाळेतील बालगोपाळांनी लेझीमवर ठेका धरीत गणरायाचे स्वागत केले़ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी चिमुकल्यांनी गावातून मिरवणूक काढून ‘श्रीं’ची मूर्ती आणली़ मिरवणुकीत चिमुकल्या मुली, मुलींनी लेझीमवर धरलेला ठेका सर्वांचे आकर्षण ठरला़श्रीरामपूर येथे विविध मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्यासह विविध संस्था तसेच घरोघर गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ श्री गणेशाची विधिवत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली़