शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील भाजपा पदाधिका-यावर हल्ला करणारे आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 18:47 IST

औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली.

अहमदनगर: औरंगाबाद येथील भाजपा पदाधिका-यावर महिनाभरापूर्वी खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना येथील स्थानिक गुन्हे शाखेने घोडेगाव (ता़ नेवासा) येथून अटक केली.बाळू कैलास गायकवाड (वय २५ रा. कैकाडीवाडा, बेगमपूरा औरंगाबाद), गिरीश बााबसाहेब जाधव (वय २४ रा. बजरंग चौक, पढेगाव, औरंगाबाद), शैलेश संदिप पटारे (रा. डिंबर गलली औरंगाबाद) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत़औरंगाबाद येथील भाजपाचे सरचिटणीस संजय फकिरचंद फत्तेलष्कर यांच्यावर जुन्या वादातून ६ मे रोजी औरंगाबाद येथील बेगमपूरा परिसरात तिघांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून हल्ला केला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गायकवाड, जाधव व पटारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून हे तिघे फरार होते. हे तिघे घोडेगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. सोमवारी एलसीबीमधील सहाय्यक निरिक्षक डॉ. शरद गोर्डे, उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, कॉस्टेबल सोन्याबापू नानेकर, योगेश गोसावी, उमेश खेडकर, निगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले,विजय ठोंबरे, योगेश सातपुते, बबन बेरड आदींच्या पथकाने घोडेगाव येथून तिघांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी बेगमपूरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस