अहमदनगर : महापालिकेच्या नालेगाव येथील अमरधामात अंधार असल्याने चारचाकी वाहनाचे लाइट लावून अंत्यविधी करण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढवली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
निर्मलनगर परिसरातील एकाचा बुधवारी मृत्यू झाला. नातेवाईक अंत्यविधीसाठी अमरधाम येथे दाखल झाले. अंत्यविधीसाठी उजव्या बाजूला दोन, तर डाव्या बाजूला दोन, असे चार ओटे आहेत. नातेवाईक मृतदेह घेऊन उजव्या बाजूच्या ओट्याजवळ आले असता, तिथे किर्र अंधार होता. काहीच दिसत नव्हते. आंधारात अंत्यविधी कसा करावा, म्हणून नातेवाईकांनी चारचाकी ओट्याजवळ आणून उभी केली. गाडी सुरू करून बल्प लावले. या उजेडात सरण रचून अंत्यविधी केला. अंत्यविधी होईपर्यंत महापालिकेचा एकही कर्मचारी तिकडे फिरकला नाही. माजी नगरसेवक निखिल वारे हेही अंत्यविधीसाठी पोहोचले. त्यांनी दिवे का लावले नाहीत, अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडे केली असता, दोन महिन्यांपासून दिवे बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही बाब वारे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. वारे यांनी फोन केल्याने महापालिका प्रशासनाला जाग आली. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी अमरधाममधील उजव्या बाजूचे दिवे बदलून नवीन बसविले.
...
अमरधाममध्ये अंधार असल्याने अक्षरश: चारचाकीचे लाइट लावून अंत्यविधी करावा लागला. ही बाब अत्यंत गंभीर असून, लाइट गेल्या दोन महिन्यांपासून बंद का होते, याची आयुक्तांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी.
- निखिल वारे, माजी नगरसेवक
..
सूचना फोटो:११ अमरधाम नावाने आहे.