शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात कोरोनाबाधित ४५ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर ...

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला असून, गुरुवारी दिवसभरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. मृतांच्या संख्येत आठवभरात अचानक वाढ झाली आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. अमरधाममध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्युत दाहिन्या आहेत. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात दोन विद्युत दाहिन्यांमध्ये २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या विद्युत दाहिन्या सायंकाळपर्यंत सुरू होत्या. मृतांचा आकडा मोठा असल्याने २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाल्याने अमरधाममधील यंत्रणेवरही ताण आला. अंत्यविधीवेळी नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. त्यांनी दिवसभर अंत्यविधीचे काम केले. रात्री तर मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची रांगच लागली होती. त्यामुळे व्यवस्थापनाने ओट्यावर अंत्यविधी उरकले. रात्री दीड वाजेपर्यंत अंत्यविधीचे काम सुरू होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्या. दुपारपर्यंत कोरोनामुळे दहाजणांचा मृत्यू झाला. सायंकाळी हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

....

एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यंसस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. त्यात खासगी रुग्णालयातील मृतांचा आकडाही मोठा आहे. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथेच आणले जात असल्याने यंत्रणेचा गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे.

......

मनपाची नवीन शववाहिका अडकली लालफितीत

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गत एप्रिल महिन्यात एका दिवसात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी एकाच शववाहिकेतून पाच ते सहा मृतदेहांची वाहतूक होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मनपाने अन्य एक शववाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, वर्ष उलटूनही नवीन शववाहिका खरेदी केलेली नाही. त्यामुळे एकाच शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक आजही सुरू असल्याचे दिसून आले.