शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा ‘झेडपी’वर मोर्चा

By admin | Updated: August 10, 2016 00:25 IST

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला

अहमदनगर : अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयसीडीएस योजनेचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होवू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली. युनियनच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत करावे. बँकेकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या मानधनाची माहिती व्यवस्थित मिळत नाही. यामुळे त्यांना मानधनाची दर महिन्याची स्लीप देण्यात यावी.मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रुपांतर करण्यात यावे, सेवकांचे दर महिन्याचे भत्ते दर महिन्याला अदा करण्यात यावेत. प्रकल्पाच्या उद्दिष्टा व्यतिरिक्त इतर कामाचा भार लादू नये. शासनाच्या एकरकमी योजनेचा लाभ सेविका-मदतनिसांना देण्यात यावा, मासिक अहवाल सादर करण्यासाठी विवरण पत्र उपलब्ध करून द्यावेत. आहार शिजवणाऱ्या बचत गटांची बिले प्रकल्पाकडे थकीत आहेत. त्याची चौकशी होवून बचत गटांना ते अदा करण्यात यावे. इंधन बिल दरमहा अदा करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. राजेंद्र बावके, बाळासाहेब सुरूडे, शरद संसारे, जीवन सुरूडे यांनी केले.(प्रतिनिधी)