शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

सेवानिवृत्त पोलिस अधिका-याने उभारले मोफत अभ्यासिका मंदीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 11:41 IST

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : ग्रामीण भागातील तरुणांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, देशासाठी चांगले अधिकारी, नागरिक घडावेत या भावनेने प्रेरित होऊन ...

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : ग्रामीण भागातील तरुणांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, देशासाठी चांगले अधिकारी, नागरिक घडावेत या भावनेने प्रेरित होऊन मुंबईतील सेवानिवृत्त आधिका-यानं मूळगावी अभ्यासिका उभारली. सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर ठवाळ यांनी आढळगाव येथे ४० लाख खर्च करून ‘अमित निवासी अभ्यासिका मंदीर’ उभारले आहे. हे केंद्र श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यामधील तरुणाईला मोफत उपलब्ध राहणार आहे.मधुकर ठवाळ यांचे मुळ गाव आढळगाव. पण वडील बयाजी यांनी पोट भरण्यासाठी मुंबई गाठली. एका कापड मिलमध्ये नोकरी स्विकारली, त्यामुळे ठवाळ परिवार मुंबईकर झाला. मधुकर ठवाळ यांचे प्राथमिक शिक्षण आढळगाव मध्ये झाले. राहुरी कृषी विद्यापीठात बी. टेक. झाले. एम.पी.एस.सी. परिक्षा देऊन १९७९ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाले. सन २००९ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मधुकर ठवाळ सेवानिवृत्त झाले. त्यांनी चुलत बंधू अंकुश ठवाळ यांना पोलीस करण्यासाठी मार्गदर्शन केले. मधुकर ठवाळ यांचा नोकरीचा कार्यकाळ मुंबईत गेला. त्यामुले गावचा जनसंपर्क कमी झाला, पण गावचा जिव्हाळा कायम होता. हा जिव्हाळा पुन्हा वृध्दिंगत करण्यासाठी मधुकर ठवाळ यांनी आढळगाव मधील वडीलोपार्जीत जागेत निवासी अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला. या वास्तूचा आकर्षण प्लॅन तयार केला. याकामी अंकुश ठवाळ यांनी मोलाची साथ दिलीया केंद्रामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी सुमारे पाच हजार पुस्तके, नियतकालिके , वर्तमानपत्रे असा खजिना उपलब्ध केला. अभ्यासासाठी राहणा-या विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत व्यवस्थाही करण्यात आली आहे.‘‘इच्छा पुर्ण झाली’’ - ठवाळमी परिस्थितीवर मात करून पोलिस अधिकारी झालो. मला दोन मुली, एक मुलगा. मुलगा खूप हुशार पण दुदैर्वान वीस वषापूर्वी अपघाती निधन झाले. तेव्हापासून मी समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतला. दोन मुली, एक मुलगा दतक घेतला. अमित निवासी अभ्यासिका केंद्रामधून चांगले अधिकारी सेवक घडावेत एवढीच अपेक्षा आहे. - मधुकर ठवाळ, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबईग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी खूप अडचणी येतात. निवासी अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. या मंदिरात तरुणाई घडेल असा विश्वास आहे. -बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा