श्रीगोंदा : विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात जन्मठेपेची सजा भोगत असलेला कैदी राजेंद्र तिवारी याने संचित सुटी संपल्यानंतर येताना मोबाईल आणला. इतर चार कैद्यांनी या मोबाईलद्वारे मित्रांशी संभाषण केले, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. राजेंद्र तिवारी हा मुंबईतील आरोपी असून, एका खून प्रकरणी राजेंद्र तिवारी विसापूर जेलमध्ये जन्मठेपेची सजा भोगत आहे. कैद्यांना मोबाईल वापरण्यासाठी प्रोत्साहन देणारे पोलीस हवालदार मारूती साबळे यांचीही चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक फौजदार बजरंग गवळी यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी) |
चार कैद्यांनी साधला मित्रांशी संवाद
By admin | Updated: January 27, 2015 12:22 IST