शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

दौंड - मनमाड रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीसाठी चार पॅसेंजर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:37 IST

रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.

श्रीरामपूर : रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुदखेड- दौंड, मुदखेड-पुणे, दौंड - नांदेड व पुणे - नांदेड या चार पॅसेंजर २५ एप्रिल ते २३ मे या एका महिन्याकरिता दुरुस्तीच्या कामासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेस्थानक प्रमुख एल.पी.सिंह यांनी दिली. वरील चार रेल्वे रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचा ताण अन्य रेल्वे व एसटी वाहतुकीवर पडणार आहे. साईनगर-पंढरपूर ही रेल्वे यापूर्वी चार महिन्यांकरिता बंद करण्यात आली होती. ती नुकतीच सुरु झाली आहे. मात्र ती आठवड्यातून अवघे तीन दिवस धावते. मुदखेड-नांदेड- दौंड(क्र.५७५१६), मुदखेड-नांदेड-पुणे(क्रमांक -५१४२२), दौंड - नांदेड (क्रमांक -५७५१५) व पुणे नांदेड-मुदखेड(क्रमांक - ५१४२१) या चार पॅसेंजरने नोकरदारवर्ग नगर व अन्य स्थानकावर दररोज प्रवास करतो. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेस्थानक प्रमुख वाणिज्य उपनिरीक्षक वाढे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरRailway Passengerरेल्वे प्रवासी