शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात आणखी चार जणांना कोरोनाची लागण; निमोण येथील रुग्णाचा नाशिकमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:09 IST

बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या चार जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुभे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या होत्या. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा  शनिवारी रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे.

अहमदनगर : बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या चार जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुभे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या होत्या. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा  शनिवारी रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७४ असून जिल्ह्याबाहेरील बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

         दरम्यान, घाटकोपर येथील महिलेचा रिपीट अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. इतर १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी सकाळी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यातील एक ३६ वर्षीय व्यक्ती १७ मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी ६० वर्षीय बाधीतव्यक्ती तुर्भे, मुंबई येथून २२ मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती. तिसरी ३२ वर्षीय बाधीत व्यक्ती औरंगाबाद येथून २० मे रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आली होती. नेवासा बुद्रूक येथे २२ मे रोजी उल्हासनगर येथून आलेल्या ६० वर्षीय महिलाही बाधीत आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वी बाधीत आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या