शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठार

By admin | Updated: May 16, 2016 00:10 IST

राहाता : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर चार जखमी

राहाता : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली़रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस (क्ऱ एम़ पी़ १५, पी़ ३९५४) व कंटेनर (क्ऱ जी़ आय़ १२, झेड. १३३६) हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (वय ४३, उज्जैन, मध्यप्रदेश), वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही), रचना जैन (वय ४२, उज्जैन), अर्चना शहा (वय ४५, इंदोर) हे मयत झाले़ मयतांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले़ या अपघातात दिमला गुलशन दुप्पड (वय ६०, नगर), विरेश चड्डा (नगर), रितेश दिनेशकुमार जैन (वय ४५, इंदोर) जनक रितेश जैन (वय १३, इंदोर) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ (वार्ताहर)आठवड्यातील दुसरी घटना दरम्यान, पहाटेच्या वेळी महामार्ग पोलिसांकडून अस्तगाव माथा येथे वाहने अडवली जातात. रविवारी पहाटेही पोलिसांनी कंटनेरला पोलीस व्हॅन आडवी लावल्यामुळे कंटनेर चालकाने जोरात ब्रेक मारला़ त्यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी बस कंटेनरमधील पवनचक्कीच्या पात्यावर आदळली, असे बसमधील प्रवाशांनी सांगितले़ कोल्हार येथेही मागील आठवड्यात याच प्रकारे कंटेनरमधील पवनचक्कीला धडक झाल्याची घटना ताजी आहे़