शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

सुप्यातील चार गुंडांवर तडीपारी

By admin | Updated: July 4, 2016 23:47 IST

सुपा : खून, दरोडा, अपहरण अशा विविध गुन्ह्यातील सुपा येथील तिघे व हंगा येथील एकजण अशा चार जणांना सुपा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे़

सुपा : खून, दरोडा, अपहरण अशा विविध गुन्ह्यातील सुपा येथील तिघे व हंगा येथील एकजण अशा चार जणांना सुपा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ त्यामुळे नेहमीच थाटात वावरणाऱ्या गुन्हेगारांवर सुपा पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे़तडीपार केलेल्या कानिफ उर्फ कान्हा राधाकिसन पोपळघट याच्याविरोधात पारनेर व सुपा पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, अपहरण, शिवीगाळ, दमदाटी असे विविध १३ गुन्हे दाखल आहेत़ राहुल अशोक पवार याच्या विरोधात अपहरण दरोडा, दंगल, रस्तेलूट, दमदाटी असे ११ गुन्हे दाखल आहेत़ रामदास दिलीप पवार याच्याविरोधात घरफोडी, दंगल, रस्तेलूट, असे पाच गुन्हे दाखल आहेत़ हे तिघेही सुपा येथील रहिवासी असून, कानिफ पोपळघट व राहुल पवार यांंना १ वर्षासाठी तर रामदास पवार याला दोन वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे़ हंगा येथील प्रमोद तात्याबा गिरी याच्याविरोधात घरफोडी, दंगल, रस्तेलूट, शिवीगाळ असे गुन्हे दाखल असून, त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़ या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, यासाठी पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता़ तर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला़ या गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पारित होताच सोमवंशी यांनी या गुन्हेगारांना तडीपार धाडले़ हे सर्व गुन्हेगार सध्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत असल्याचे पोलिसांनी सांगितले़