विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी प. पू. आनंदाश्रम स्वामी पॅनलने तेरापैकी नऊ जागा जिंकत गड अबाधित राखण्यात यश मिळवले. विरोधी स्वामी कृपा महाविकास परिवर्तन पॅनल चार जागा मिळवण्यात यशस्वी झाले.
प. पू. आनंदाश्रम स्वामी पॅनलचे नेतृत्व कर्मयोगी कुंडलीकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे व माजी सरपंच सर्जेराव रोडे यांनी केले. विरोधी स्वामी कृपा महाविकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व डॉ. अनिल मोरे व माजी उपसरपंच गुलाब रामफळे यांनी केले. यावेळी सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून दाखवायचेच, असा चंग विरोधी गटाने बांधला होता. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही.
विजयी उमेदवार : दत्तात्रय विश्वनाथ दारकुंडे, विजय सूर्यभान दारकुंडे, गजानन बाजीराव पवार, गोवर्धन साहेबराव रोडे, राजेंद्र भागचंद रोडे, ईश्वर रामचंद्र लहाकर, संतोष विठ्ठल शिंदे, सीमा भिमाजी गाढवे, सरूबाई साहेबराव मोरे (सर्व प. पू. आनंदाश्रम स्वामी पॅनल), डॉ. अनिल शिवराम मोरे, भगवान चिमाजी घुटे, गुलाब भिकाजी रामफळे व गणेश नाना रोडे (सर्व स्वामी कृपा महाविकास परिवर्तन पॅनल). विजयी उमेदवारांना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.