शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडप पाडला म्हणून माजी आमदार राठोड यांची पोलीस ठाण्यात तक्रार; नगर महापालिकेविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:11 IST

नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला.

अहमदनगर : नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला. त्यामुळे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून, राठोड यांनी उपोषण सुरु केले आहे.नेता सुभाष चौकात उभारण्यात येणारा मंडप पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन सकाळी नेता सुभाष चौकात दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांनी मंडप पाडला. त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते सभागृहनेते गणेश कवडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, सुरेश तिवारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी येथील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. महापालिकेने कोणतीही नोटीस न देता मंडप पाडल्याची तक्रार त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी न घेतल्यामुळे हा मंडप पाडल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर वास्तविक पाहता प्रशासनाने मंडप उभारण्याची परवानगी अगोदर देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अगोदर परवानगी दिली नाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करताना मंडळ उभारलेला दोन ते तीन आठवडे लागतात. या मंडळाचा मंडप कोणत्याही रस्त्याला अडथळा ठरत नसताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर मंडप पाडला आहे, असे राठोड यांनी सांगितले.

राठोड यांचे उपोषण

महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. अधिका-यांनी कोणतीही पूर्वसुचना न देता मंडप पाडला म्हणून पालिकेच्या निषेधार्थ शिवसेनेचेच माजी आमदार अनिल राठोड यांनी नेता सुभाष चौकात उपोषण सुरु केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाAnil Rathodअनिल राठोड