शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: August 20, 2016 01:03 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गणांची प्रारुप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़

अहमदनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या डिसेंबरअखेर होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गणांची प्रारुप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ तसे आदेश जिल्हा प्रशासनास शुक्रवारी प्राप्त झाले़ जिल्ह्यातील गटांत दोनने तर गणांत चारची घट झाली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे ७३ तर पंचायत समित्यांचे १४६, असे संख्याबळ असणार आहे़ अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गट व गण रचनेचा श्रीगणेशा झाला आहे़ राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि़ जा़ वागळे यांनी गट, गण आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला़ गट व गणांचा प्रारुप प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांना सादर करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर आहे़ विभागीय आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सदस्य पदासाठी २८ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत निघेल़ गट, गण आणि आरक्षणाची प्रारुप रचना २५ नोव्हेंबर रोजी अंतिम केली जाणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबरअखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ दुसरा टप्पा गट व गणनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचा असेल़ मतदारयाद्या अद्ययावत होऊन निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबर अखेरीस जाहीर होईल, अशी शक्यता प्रशासनाले वर्तविली आहे़ सन २०११ ची लोकसंख्या निवडणुकीसाठी गृहीत धरली आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३६ लाख आहे़ त्याआधारे गट व गणांची संख्या निवडणूक आयोगाने निश्चित केली़ जिल्हा परिषदेत सध्या ७५ गट आहेत़ आगामी निवडणुकीत २ गट कमी झाले आहे़ त्यामुळे गटांची संख्या ७५ वरून ७३ झाली आहे़ अर्थात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोनने कमी झाली़ पंचायत समितीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही़ जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांत सध्या १५० गण आहेत़ चार गणही कमी झाले आहेत़ त्यामुळे गणांची संख्या आता १४६ झाली आहे़ लोकसंख्या वाढल्याने सदस्य संख्या वाढणे अपेक्षित होते़ पण, जिल्ह्यात नव्याने अकोले, कर्जत आणि पारनेर शहरांना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला़ त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेतून वगळला गेला़ त्याचबरोबर शेवगाव जामखेडमध्ये नव्याने नगरपालिका स्थापन झाल्या़ त्यामुळे शेवगाव व जामखेड शहर जिल्हा परिषदेतून वगळले गेले़ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद निवडणुकीचे नोडल आॅफीसर दत्तात्रय बोरुडे व तहसीलदार गणेश मरकड यांच्या मार्गदशनाखाली तहसीलदारांमार्फत ही प्रकिया राबविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)