शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या सातबारावर शेतीचे खरेदीखत

By admin | Updated: August 29, 2014 23:38 IST

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर शेतकरी नसताना खोट्या सातबारा उताऱ्याच्या आधारे शेतकरी असल्याचे दाखवून शेतजमिनीचे खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूरशेतकरी नसताना खोट्या सातबारा उताऱ्याच्या आधारे शेतकरी असल्याचे दाखवून शेतजमिनीचे खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही नेवासा तहसील कार्यालयाने संबंधितांविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही.मौजे वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील गट क्रमांक ११३ पैकी क्षेत्र शिवाजी रामदास सूर्यवंशी व बाळू भिवसेन हगवणे यांनी स्वत: शेतकरी नसताना शेतकरी असल्याचे खोटे कागदपत्र दाखल करून खरेदीखत नोंदवून घेतले. हा प्रकार या जमिनीचे मूळ मालक सुधाकर सखाराम आगरकर (रा. मोरगेवस्ती, आगरकरमळा, श्रीरामपूर) यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर तहसील, दुय्यम निबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याविषयी तक्रारी केल्या. सूर्यवंशी व हगवणे यांनी आगरकर यांची शेती खरेदी करण्यासाठी श्रीरामपूरच्या दुय्यम निबंधकांसमोर मौजे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील गट क्रमांक ३४१ चा शेतकरी असल्याचा सातबारा उतारा जोडला. नेवासा बुद्रूकच्या मंडळाधिकाऱ्यांनी मौजे बेलपिंपळगावमध्ये जाऊन स्थानिक चौकशी केली. तेव्हा गट क्रमांक ३४१/१ हा आकाश बबन आघाडे, अरूण भाऊ आघाडे, बाळासाहेब भाऊ आघाडे, संभाजी भाऊ आघाडे, विठ्ठल भाऊराव आघाडे, रमेश भाऊराव आघाडे, गट क्र. ३४१/२ हा मंगल लक्ष्मण आघाडे, लक्ष्मण विठोबा आघाडे, विजय लक्ष्मण आघाडे, सरस्वती भाऊसाहेब राहिंज, गट क्र. ३४१/३ हा आशाबाई दत्तात्रय बोर्डे, दत्तात्रय गोपीनाथ आघाडे, राजेंद्र गोपीनाथ आघाडे, सोमनाथ दत्तात्रय बोर्डे यांच्या नावाचा असल्याचे निष्पन्न झाले. या क्षेत्राशी, गट क्रमांकाशी सूर्यवंशी व हगवने यांचा संबध, उल्लेख नसल्याचे बेलपिंपळगावच्या तलाठी कार्यालयाचे रेकॉर्ड पाहता त्यांनी खरेदीखतासाठीच्या अर्जासोबत जोडलेला ७/१२ उतारा खोटा असल्याचे निदर्शनास येते, असा स्पष्ट अहवाल नेवाशाच्या तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्याच्या १३ फेब्रुवारी २०१४ च्या अहवालावरून १८ फेब्रुवारी २०१४ ला श्रीरामपूर तहसीलदारांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेने ६ जून २०१४ ला नेवासा तहसीलदारांना शिवाजी सूर्यवंशी यांनी वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील गट क्र. ११३ पैकी २ हेक्टर २० आर शेतजमिनीच्या खरेदी खतासाठी शेतकरी पुरावा म्हणून खोटे ७/१२ उतारे सादर केल्याने त्यांच्याविरूद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करावा. मौजे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील गट क्र. ३४१ चा खोटा ७/१२ उतारा तयार करण्यात गावच्या तलाठ्याचा सहभाग आहे किंवा कसे याची सविस्तर चौकशी करून सहभाग असल्यास त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी, असा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.पण ३ महिन्यात याबाबत नेवासा तहसीलदारांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याने खोट्या कागदपत्रांआधारे फसवणूक करणारे आरोपी मोकाट आहेत.खरे का खोटे....?अर्जदाराने दस्तासोबत सादर केलेला उतारा खरा किंवा खोटा आहे, याची शहानिशा करण्याचा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी अधिकाऱ्यांना अधिकार नसतो, असा स्पष्ट अभिप्राय श्रीरामपुरच्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या कार्यालयात होणारे व्यवहार खरे की खोटे देवजाणो, अशीच परिस्थिती आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत केल्याच्या आरोपावरुन यापूर्वीचे दुय्यम निबंधक शिमरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल असून ते जामिनावर आहेत. त्यामुळे पुन्हा या कार्यालयाच्या खरेखोटेपणाचा विषय ऐरणीवर आला आहे.जूनमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर ३ महिन्यात नेवासा तहसीलदारांनी याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. या आदेशाप्रमाणे काय कारवाई केली? याची माहिती घेण्यासाठी नेवासा तहसीलमध्ये गेलो असता, तहसीलदारांनी कारवाई करायला, गुन्हा दाखल करायला २/३ वर्षे लागतील, असे सांगितले.-सुधाकर सखाराम आगरकर, श्रीरामपूर