नगर तालुक्याच्यावतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या शोकसभेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, काँग्रेस पक्षाचे नेते विनायक देशमुख, बाजार समिती सभापती अभिलाश घिगे, खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश सुबे, नगरसेवक मनोज कोतकर, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, सुनील पंडित, शरद दळवी, दादासाहेब दरेकर, विलास शिंदे, रेवन चोभे, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट, बबन आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, बहीरू कोतकर, राजेंद्र बोथरा, छत्रपती बोरूडे, राहुल पानसरे, रावसाहेब कर्डिले, अशोक झरेकर, बाबासाहेब खर्से, रभाजी सूळ, शिवाजी कार्ले, जालींदर कदम, मनोज कोकाटे, सचिन सातपुते, संजय काळे आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरू केल्या असून त्याही योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मोफत उज्ज्वला गॅस योजना देशात एक नंबरने आपल्या मतदार संघात राबविण्याचे काम केले. शहराच्या वैभवात भर पडावी, दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्यमहामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. याचबरोबर बाह्य वळण रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्याची ओळख होती. कुठलाही वारसा नसतांना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती, परंतु मला राहुरी मतदार संघातून आमदार होण्यासाठी सहकार्य केले. पक्षनिष्ठा जपणारा नेता आज आपल्यात नाही.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, माजी खासदार दिलीप गांधी यांचे उड्डाण पुलाला नाव देण्यासाठी आम्हा सर्वांचे अनुमोदन आहे. पक्षनिष्ठेला महत्त्व देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ध्येय, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले राजकारण करून समजाचे प्रश्न सोडविले.
.....फोटो आहे.