शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साई नगरात पेटली राष्ट्रभक्तीची ज्योत, साईनगरीतील पहिला प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:33 IST

केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून

प्रमोद आहेरशिर्डी (अहमदनगर): केवळ धार्मिकतेचा प्रचार प्रसार न करता साईभक्तांच्या ह्वदयात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचे कार्यही संस्थानच्या माध्यमातुन करण्यात येते असे़ पहिल्या प्रजासत्ताक दिनी साईसंस्थानने गावातून रथ मिरवणूक काढून व कर्मचा-यांना भोजन देऊन आनंद साजरा केला होता़२६ जानेवारी १९५०, गुरूवार रोजी पहिल्या प्रजासत्ताक दिनाला शिर्डीत समाधी मंदीराजवळ ध्वजारोहन समारंभ करण्यात आला़ या आनंदप्रित्यर्थ संस्थानच्या सर्व नोकरांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ पहिल्या प्रजासत्ताक दिनापर्यंत शिर्डीत वीज आली नव्हती त्यामुळे तेलाचे दिवे लावून रोषणाई करण्यात आली़विशेष म्हणजे अती विशिष्ठ सणांना व दिवशीच बाबांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येते़ मात्र या परंपरा बाजुला ठेवत प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पहिल्या प्रजासत्ताक दिनी गावातून बाबांच्या प्रतिमेची रथातुन मिरवणुक काढण्यात आली होती़ रात्री कोपरगावचे गजानन विश्वनाथ जोशी व कोपरगावकर भजनमंडळींचे संगीत भजन झाले़ पंडीत जगन्नाथबुवा सुरतकर, व्यासबुवा वेशीकर, सोलापुरचे रामकृष्णबुवा सोमण, दिगंबरबुवा, माधवराव खलेकर, रामदास नायडु वगैरे सोलापुरच्या भाविकांनी गायन, वादन, फिडल, तबला, हार्मोनियमची तर दामुबाण्णा बेलापुरकर यांनी सनईवादन करून समाधी समोर हजेरी दिली़शिर्डीत वीज पोहचण्यापुर्वी संस्थानने वीज निर्मितीसाठी लेंडीबागेजवळ डिझेल इंजिनावर चालणारे पॉवर हाऊस निर्माण केले़ यामुळे गणेश चतुर्थी ५ सप्टेंबर १९५१ च्या आसपास शिर्डीत पहिला दिवा लागला़ यानंतर उत्सवाबरोबरच राष्ट्रीय सणांच्या दिवशी मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़१९६१ च्या प्रजासत्ताक दिनी सकाळी कळसानजीक गच्चीवर ध्वजारोहण करण्यात आले़ या निमीत्ताने समाधी व मंदीरावर वीजेच्या रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली़ या दिवशी ग्वाल्हेरचे महाराजांच्या देणगीतुन संस्थान नोकर, गावातील पुढारी, शिक्षक यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले़ रात्री दोन वाजेपर्यंत विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरे करण्यात आले़पहिले ध्वजारोहन मंदीरालगत झाले असले तरी नंतर मात्र समाधी मंदीरावर ध्वजारोहन सोहळा होत असे़ त्यावेळी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात येई़ त्यानंतर १९८२ च्या आसपास हा कार्यक्रम लेंडीबागेत, जुन्या साईनिवास इमारती समोर होवु लागला़ जागा अपुरी पडु लागल्यानंतर १९९९ पासुन ध्वजारोहन नवीन भक्त निवास, पाचशे रूमच्या मागे, कार्यकारी अधिकारी बंगल्याच्या समोरील मैदानावर होवु लागला़