शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२८६० किलो वजनाचा ध्वजस्तंभ  

By प्रदीप.गरड | Updated: September 27, 2017 17:09 IST

शिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़

ठळक मुद्देसाई समाधी शताब्दी सोहळा        १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या ध्वजावर शताब्दीचा ध्वज फडकाऊन सोहळ्याचा श्रीगणेशा

 प्रमोद आहेरशिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़.    १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या ध्वजावर शताब्दीचा ध्वज फडकाऊन सोहळ्याचा श्रीगणेशा होत आहे़ साईसंस्थानच्या प्रतिष्ठेला साजेसा ध्वज बनविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे़ या ध्वज स्तंभाची उंची ५१ फूट आहे. त्यावर नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या लेंडीबागेत डौलात फडकणारा दहा फूट  लांब व पंधरा फूट रूंदीचा विशालकाय ध्वज भाविकांचे लक्ष वेधून घेईल. शताब्दीचा ध्वज भगव्या रंगात आहे. त्यावर मध्यभागी साईबाबांची प्रतिमा व श्रद्धा, सबुरी हा संदेश तसेच शताब्दीचे बोधचिन्ह असेल.  वरील व खालील बाजूस साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव २०१७-१८ असा मराठी व इंग्रजीत उल्लेख असेल़सार्इंना सुवर्ण सिंहासन देणारे भाविक आदिनारायण रेड्डी यांच्या देणगीतून हा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे़ या स्तंभात २१०० किलो वजनाचा लोखंडी खांब, त्यावर ७६० किलो पितळेचे आकर्षक वेष्टन तयार करण्यात आले आहे़ साई पद्मालय मेटल आर्ट अ‍ॅँड क्राफ्टचे रा़ अलगाराजा सतपती हे कारागिर या स्तंभाची उभारणी करीत आहेत. कोपरगावचे योगेश पाटील यांनी सिव्हील वर्कचे काम केले आहे़१५ बाय १५ चौरस फुटाच्या आरसीसी बांधकामाच्या चौथºयावर हा स्तंभ उभारण्यात आला आहे. स्तंभाचा बैठा भाग ९ बाय ९ फूट  आकाराचा आहे़ स्तंभाच्या वर ‘ओम’ आहे. त्यावर ‘त्रिशुल’ची प्रतिकृती आहे़ स्तंभाच्या चौथºयावरील भागावर चारही बाजूंनी सार्इंच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत़ १८ सप्टेंबरपासून या स्तंभाचे काम सुरू झाले आहे. २४ सप्टेंबरला यावरील ‘ओम व त्रिशुल’ ची साई मंदिरात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, अभय शेळके, आदिनारायण रेड्डी आदी उपस्थित होते़ ध्वजाच्या परिसरात पाण्याचे नवीन धबधबे तयार करण्यात येत आहेत़.