शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पूर्णवाद’ लावणार पाच हजार झाडे

By admin | Updated: July 11, 2016 00:57 IST

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातून झाडे मागविण्यात आली आहेत. याच दिवशी वृक्षदिंडी, वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी शिष्य परिवाराला यंदा झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अ‍ॅकॅडमीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. याच अ‍ॅकॅडमीने दोन महिन्यापूर्वी पारनेरला पर्यावरण परिषद आयोजित केली होती. गुरुपौर्णिमा ही वृक्षपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील पूर्णवाद परिवारातील दोन हजार तरुण पारनेरमध्ये झाडे लावण्यासाठी दाखल होणार आहेत. पूर्णवाद परिवाराच्या सर्व मंदिरांमध्येही गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडे लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रमुख सोहळा १९ जुलै रोजी पारनेरमध्ये होणार असल्याची माहिती अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष राहुल संत यांनी दिली. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पारनेर पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार, योगासन मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी माजी सैनिक दथरथ बोरुडे, गीताराम म्हस्के, अ‍ॅड. अमित देशपांडे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास उढाण, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, प्राचार्य एच. पी. गोडळकर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात येईल. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत म्हस्के, महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर, विवेक देशपांडे, लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन गौरव पुरंदरे, सुरेंद्र रोडगे, स्वप्नील जहागीरदार, गणेश संत, मंगेश मोहिते आदींनी केले आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दुष्काळ आणि पाण्याची घटलेली जलपातळी या पार्श्वभूमीवर राज्यभरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पारनेर तालुक्यात वर्षभरात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यातील पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन १९ जुलै रोजी करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या ‘माय सिटी-माय ट्री’अभियानामुळे झाडे लावण्याबाबत जागृती वाढली आहे.-अ‍ॅड. राहुल संत, आयोजक