शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवाच्या शाळेतील अभियंत्याने बांधली पाच हजार काच मंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:36 IST

गेल्या चार दशकात तब्बल पाच हजार मंदिर बनविणारा अभियंता मोहनलाल सोलंकी यांची भटकंती सुरू आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणा-या सोलंकी यांच्यासह चार कुटुंब सध्या पाल ठोकून राहुरी येथील नांदूर रस्त्यालगत मुक्कामी आहे.

भाऊसाहेब येवलेराहुरी : वडिलांकडून काचेपासून मंदिर बनविण्याचा वारसा मिळाल्यानंतर गेल्या चार दशकात तब्बल पाच हजार मंदिर बनविणारा अभियंता मोहनलाल सोलंकी यांची भटकंती सुरू आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणा-या सोलंकी यांच्यासह चार कुटुंब सध्या पाल ठोकून राहुरी येथील नांदूर रस्त्यालगत मुक्कामी आहे.पालावर महिला, पुरूष व मुले काचेपासून मंदिर बनवितात़ बनविलेले मंदिर व शो पीस घरोघरी जाऊन विकताना कलाकार म्हणून सन्मानही मिळतो, तर काही ठिकाणी कमी किमतीसाठी घासाघीस करतांना कटू अनुभवही येतात.सोळंकी यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असली तरी काचेपासून मंदिर तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मंदिर बनविण्यासाठी आकारानुसार वेळ लागतो. मोठे मंदिर बनविताना दोन दिवस लागतात. याउलट दिवसाला दोन लहान मंदिर होतात. भोपाळ (मध्यप्रदेश) येथील सोळंकी यांची नातेवाईकांसह आठ महिने महाराष्ट्रासह अन्य राज्यात भटकंती सुरू असते. पावसाळयात गावी मोलमजुरी करून उपजीविका करावी लागते. सरकारने दिलेल्या जागेवर बांधलेल्या घरात चार महिने मुक्काम असतो.मंदिर बनविण्यासाठी काच, फेविकॉल, कटर हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. भटकंतीच्या काळात सोळंकी यांना या वस्तू स्थानिक बाजारपेठेत सहज उपलब्ध होतात. मंदिर किती आकाराचे बनवावे?, याचा आराखडा मनात तयार होतो. त्यानंतर काच कटरच्या सहाय्याने कापून सांगाडा तयार केला जातो. काचेवर आकर्षक तुकडे जोडले जातात. त्यामुळे सुबक मंदिर तयार होण्याचा मार्ग मोकळा होतो.मंदिर बनविण्यासाठी घरातील महिला व मुलेही तरबेज आहेत. दिवसभर मंदिर बनविण्याचे काम सुरू असते़ मंदिर तयार झाले की शहर अथवा गावात त्याची विक्री केली जाते. घरोघरी भटकंती करतांना तयार केलेल्या मंदिराला चांगली किंमत मिळेल, याची अपेक्षा असते़ दिलदार ग्राहक कलेची कदर करीत योग्य मोबदला देतात. याउलट घासाघीस करणारे ग्राहक अत्यल्प मोबदला देतात. दोन हजार पेक्षा अधिक गावांमध्ये सोळंकी यांनी भटकंती करीत मंदिरांची विक्री केली. सोळंकी यांच्याबरोबर भाचा मनू राठोड, गंगाराम राठोड, शंकर राठोड यांचेही कुटुंब भटकंंती करते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी