शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नगर-पुणे महामार्गावर पकडले पाच लुटारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

पळवे : नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा टोलनाक्यासह जातेगाव घाटात वाहने अडवून प्रवाशांना लुटणाऱ्या पाच जणांना वेगवेगळ्या कारवाईत ...

पळवे : नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा टोलनाक्यासह जातेगाव घाटात वाहने अडवून प्रवाशांना लुटणाऱ्या पाच जणांना वेगवेगळ्या कारवाईत सुपा पोलिसांनी अटक केली.

शुक्रवारी दुपारी चार वाजता सुपा पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी नगर-पुणे महामार्गावरून जात होते. त्यावेळी दोन मोटारसायकल पुण्याच्या दिशेने चालल्या होत्या. त्यातील दोन्ही दुचाकीवर तिघे बसलेले होते. त्यांच्या हालचाली पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दोन्ही दुचाकी थांबविण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पटेल, खैरे यांनी त्यांना थांबवून चौकशी सुरू केली. यावेळी नयन राजेंद्र तांदळे (वय २६, रा. भिस्तबाग चौक, अहमदनगर) याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू आढळून आला. तीन हजारांची रोकड व आधारकार्ड मिळून आले. त्याच्याबरोबर असलेल्या विठ्ठल भाऊराव साळवे (रा. झापवाडी, ता. नेवासा) याचीही अंगझडती घेतली. त्याच्या खिशात दीड हजारांची रोकड, एक मिरची पूड आढळून आली. तिसऱ्या व्यक्तीचे नाव अक्षय बाबासाहेब ठोंबरे (रा. सावेडी) असून त्याच्या खिशातही मिरची पूड मिळून आली.

दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील एक जण पळून गेला. त्या दुचाकीवरील शाहुल अशोक पवार (वय ३१), अमोल छगन पोटे (वय २८, दोघे रा. सुपा, ता.पारनेर) यांच्या पँटच्या खिशातही मिरची पूड आढळून आली. त्यातील शाहुल पवार याच्याकडे एक सुराही आढळून आला. या पाचही जणांना पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

फोटो ओळी २६ पळवे

रस्ता लूट करणाऱ्या पाच जणांसह सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी.