शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST

जामखेड : नगर -जामखेड मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या पाच दरोडेखोरांना जीपसह जामखेड पोलिसांच्या पथकाने पकडले.

जामखेड : नगर -जामखेड मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या पाच दरोडेखोरांना जीपसह जामखेड पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे, रोख ४७ हजार रुपये, जीप असा एकूण दोन लाख, ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यामधील एक दरोडेखोर मोक्का गुन्ह्यातील आहे.जामखेड पोलिसांचे पथक कर्जत फाटा येथे पहाटे अडीचच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना हे दरोडेखोर जीपमधून (एम. एच. २५, आर. ३१३९) वेगाने नगरच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यामुळे पोलीस पथकाचा संशय बळावला. पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक उजागरे, पो. कॉ. संदीप तागड, तुकाराम देवकाते, गणेश गाडे, गणेश साने, हे. कॉ. भाऊसाहेब गडाख, बापू गव्हाणे यांच्या पथकाने या जीपचा १ कि. मी. अंतरापर्यंत पाठलाग करून नगर -जामखेड मार्गावरील एका हॉटेलसमोर ही जीप अडविली. जीपची तपासणी केली असता लोखंडी करवत, स्क्रू ड्रायव्हर, तलवार, नायलॉनची दोरी, मिरची पूड व रोख ४७ हजार रुपये आढळून आले, ते पोलिसांनी जप्त केले व रामदास बापू पवार (वय ५२), प्रभू शिवाजी शिंदे (वय २१, दोघे रा. वाशी, जिल्हा उस्मानाबाद), शहाजी उत्तम काळे (वय ४९), सोनाजी शहाजी काळे (वय १९, दोघे रा. पारडी, जिल्हा उस्मानाबाद), राजेंद्र गुलाब काळे (वय २४, रा. कासारखाणी, ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) या पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतले. यांपैकी राजेंद्र गुलाब काळे (वय २४) हा मोक्का गुन्ह्यातील आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश साने यांच्या फिर्यादीवरुन या पाच जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आर. जे. इंगळे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)पाच जणांची ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. परंतु पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. व त्यांच्याकडून हत्यारे व इतर ऐवज जप्त केला. या टोळीला अटक केल्यामुळे जामखेड तालुक्यात आतापर्यंत पडलेल्या दरोड्यांवर प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.