पाथर्डी : तालुक्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या पाच जणांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने नुकताच कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान केला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गतच प्रा. विजय यशवंत देशमुख, बाबासाहेब कारभारी उदमले, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब रंगनाथ पवार, पत्रकार संदीप उत्तम शेवाळे, पोस्टमन संदीप दामोधर गायकवाड आदींचा सन्मान करण्यात आला.
दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रा. सुभाषराव भागवत, मेजर रोहिदास एडके यांच्या कामाचाही गौरव करण्यात आला.
या वेळी पाथर्डी तालुकाध्यक्ष रोहिदास एडके, शंकर सोनवणे, संदीप उदमले, अविनाश पाचरणे, शिवाजी एडके, गजेंद्र उदमले, संतोष एडके, शुभम उदमले, दुर्गाजी म्हस्के, बजरंग सुडके, विनोद चन्ने, सचिन थोरात आदी उपस्थित होते. स्वागत रोहिदास एडके, प्रास्ताविक शंकर सोनवणे, सूत्रसंचालन भाषराव भागवत यांनी केले.
----
120821\4956img-20210812-wa0016.jpg
राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाथर्डी तालुका शाखा आणि चर्मकार समाज उत्सव समितीच्या वतीने