शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निंबोडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार पाच लाखांची मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 13:29 IST

नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे़

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  आ. शिवाजी कर्डीले यांची दूरध्वनीवरुन चर्चा 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे़ तर शाळा खोल्यांसाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे, अशी माहिती आ़ कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा कोसळून सोमवारी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला़ या दुर्देघटनेनंतर मंगळवारी सकाळीच ग्रामस्थांनी नगर- बीड  रस्त्यावर रास्ता रोको केला़ दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ़ शिवाजीराव कर्डिले यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला़ मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख व जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करील, असे त्यांनी फोनवरून कर्डिले यांना सांगितले़ फोनवर झालेल्या या चर्चेची माहिती आ़ कर्डिले यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दिली़ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला़ मात्र जोपर्यंत शाळेची सोय होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम असून, मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे़ आ़ राहुल जगताप, जि़ प़ सदस्य संदेश कार्ले, सेनेचे जिल्हा दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आदी यावेळी उपस्थित होते़