शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच बँकांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:29 IST

आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : आर्थिक बेशिस्तीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना टाळे लागले आहे. तर एका बँकेचे विलिनीकरण झाले आहे. बंद पडून टाळे लागलेल्या बँकांचे कर्जदारांकडे ८५ कोटी रूपये थकले असून ठेवीदारांचे अंदाजे ७० कोटी रूपये अडकून पडले आहेत.राहुरी फॅक्टरी येथील अभिनव सहकारी बँक, राहुरी येथील राहुरी पीपल्स बँक, जामखेड मर्चंट बँक, संगमनेर येथील बी. जे. खताळ जनता सहकारी बँक व कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई मर्चंटस् बँक या अहमदनगर जिल्ह्यातील पाच नागरी सहकारी बँकांना गेल्या दहा वर्षांमध्ये टाळे लागले आहे. आर्थिक गैरव्यवहारांमुळे दिवाळे निघालेल्या या बँकांवर अवसायक, प्रशासकाच्या नेमणुका केलेल्या आहेत.अभिनव सहकारी बँक ७ फेब्रुवारी २०१३ रोजी अवसायानात काढली. तेव्हा ६ कोटी १४ लाख १३ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. तर ३ कोटी ८१ लाख ३२ हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. कर्जाची रक्कम सहकार आयुक्तांच्या ६ मार्च २०१७ च्या आदेशानुसार बँकेने एन.पी.ए. ची रक्कम भरणा करून कर्ज थकबाकी शून्यावर आणली.जामखेड मर्चंट बँक १ जून २०१६ रोजी अवसायानात काढल्यानंतर ६ कोटी ७३ लाख १५ हजार रूपये कर्ज थकबाकी होती. व्याज रखडल्यामुळे ३१ मे २०१८ अखेर ही रक्कम ६ कोटी ९० लाख ५९ हजार रूपयांवर पोहोचली आहे. तर ठेवीदारांच्या अडकून पडलेल्या ठेवींचा व्याजासह आकडा ९ कोटी ४१ लाख ७२ रूपयांवर गेला आहे. बाळासाहेब सातभाई बँक अवसायानात निघाल्यानंतर ४१ कोटी ८० लाख १८ हजार कर्ज थकबाकी थकलेली होती. तर ठेवीदारांच्या १२ कोटी १३ लाख ६५ हजार रूपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या होत्या. राहुरी पीपल्स बँक ९ मार्च २०१० रोजी अवसायानात निघाली. त्या दिवशी या बँकेची २१ कोटी ५ लाख १३ हजार ९८० कर्ज थकबाकी होती. तर १३ हजार ८७४ ठेवीदारांच्या २० कोटी ४ लाख ८६ हजार ३९४ रूपयांच्या ठेवी अडकल्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या. खताळ बँकेची ३० जून २०१८ अखेर ८ कोटी ९८ लाख ३० हजार रूपयांची कर्ज थकबाकी होती. तर ठेवीदारांच्या १ कोटी ९६ लाख ६९ हजार रूपयांच्या ठेवी देणे होत्या.या पाचही बँकांवर सहकार खात्याने प्रशासक,अवसायकाच्या नेमणुका केलेल्या आहेत. ठेवीदारांच्या अडकलेल्या कोट्यवधींच्या ठेवी परत देण्यासाठी कर्जदारांकडून कर्ज वसुली करणे तसेच दोषी संचालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्या व पतसंस्थेच्या मालमत्तांचा लिलाव करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. -दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था),अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँक