शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील पहिल्या महिला अध्यक्षा हिराबाई भापकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:53 IST

आझाद हिंद सेनेला हातातील सोन्याच्या बांगड्या व रोख सहा हजार रुपये देऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारी रणरागिणी म्हणून हिराबाई भापकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यावेळी महिलांना घराबाहेर पडण्यासही मुभा नसायची, अशा संघर्षाच्या काळात त्यांनी १९४६ साली पहिली निवडणूक लढविली आणि जिंकलीही़ लोकल बोर्डाच्या त्या अध्यक्षा झाल्या. भारतातील पहिल्या अध्यक्षा म्हणून त्यांनी कारकिर्द गाजविली. त्यांच्या कारभाराची राज्यभर चर्चा होत होती.

अहमदनगर : एक वेळ आकाशाची उंची मोजता येईल, पण काही व्यक्तींचं कर्तृत्व इतकं मोठं असतं की त्यांची उंची मोजणं शक्यच नसतं. अशा काही व्यक्तींच्या संपर्कानं आपलंही जीवन उजळून निघतं. हिराबाई भापकर या अशाच एक दीपमाळ होत.हिराबार्इंचं बालपण कोल्हापूरला गेलं. थोर विचारवंत व सत्यशोधक भास्करराव जाधव यांचे धाकटे बंधू गोविंदराव यांच्या त्या कन्या. कोल्हापूर येथे १६ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांचा जन्म झाला. कोल्हापूर, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, तसेच मुंबई, राजापूर येथे त्याचं शिक्षण झालं. घरात वातावरण देशसेवेचे व अभिजात कलात्मकतेचे. त्यामुळे त्यांच्यावरही तेच संस्कार झाले. गोरा वर्ण, मध्यम उंची, नऊवारी छापील साडी, समतोल स्वभाव, चेहऱ्यावर सदा प्रसन्नता असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. १९२५ साली पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमधील आगरकर रेसिडेन्सीमध्ये त्यांचे शिक्षण सुरु असताना बापूसाहेब उर्फ प्रभाकर कोंडाजी भापकर यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर १९३० साली त्यांचा विवाह बापूसाहेब यांच्याशी झाला. माहेरचा सद्गुणांचा व देशभक्तीचा वारसा घेऊन त्या नगरला आल्या.हिराबाई यांचे पती बापूसाहेबांचे व्यक्तिमत्त्व जहाल व स्फोटक. ते फकिरी बाण्याचे. हिराबार्इंनी घर काटकसरीने चालविले. बापूसाहेब वकिली करताना स्वत:च पक्षकाराला एस.टी.चे भाडे देत आणि हिराबाई या गोरगरिबांना भाजी-भाकरी खाऊ घालत. असा सगळा मामला.स्वातंत्र्य चळवळीतही हिराबाई भापकर यांचा सहभाग होता. आझाद हिंद सेनेचे मेजर जनरल जगन्नाथराव भोसले नगरला आले. तेव्हा त्यांचा सत्कार हिराबार्इंनी करविला. नगरकरांच्यावतीने सेनेला सहा हजार रुपयांची रोख मदत आणि स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या त्यांनी राष्टÑकार्यासाठी दान केल्या. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत कार्यकर्त्यांबरोबर त्या आघाडीला राहिल्या. त्यात त्यांना अटकही झाली होती.हिराबार्इंनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या मुलांना तर घडवलेच, पण समाजही घडविला. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी समाजकार्यात भाग घेतला. बापूसाहेब व हिराबाई दोघांमध्ये कमालीची एकरूपता व माणूसपण. श्रमाचे पहाड त्यांनी उभे केले. त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या. हिराबार्इंनी अनेक संस्थांच्या कारभारावर, नियोजनावर स्वतंत्र कार्यपद्धतीची अशी ‘कालमुद्रा’ उमटविली. विविध पदांवर काम करताना हिराबार्इंनी पायाभूत अशी कामगिरी केली. आईने गर्भाला जपावे तसे त्यांनी सार्वजनिक संस्थांना जपले, वाढविले. रयत शिक्षण संस्था, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, जिल्हा साक्षरता प्रसारक मंडळ, नगरची शिशू संगोपन संस्था, राष्टÑीय पाठशाला अशी काही नावे सांगता येतील. हिराबार्इंनी नगर शहरातील स्त्री विडी कामगारात साक्षरता प्रसारही केला. ‘महाराष्टÑाचा इतिहास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले व प्रकाशित केले. महिलांना सत्तेत संधी मिळण्यास ७३ व्या घटना दुरुस्तीची वाट पाहावी लागली. परंतु हिराबार्इंनी मात्र ती संधी १९४६ सालीच स्वकर्तृत्वाने प्राप्त केली. १९४६ साली नगर जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक त्यांनी लढविली. त्या निवडून आल्या. लोकल बोर्डाच्या त्या अध्यक्षाही झाल्या. लोकल बोर्डाच्या भारतातील पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून त्यांचे नाव सुवर्णअक्षरात इतिहासाच्या पानावर कोरले गेले. त्या १९४९ पर्यंत लोकल बोर्डाच्या अध्यक्षा राहिल्या. हिराबार्इंनी हे अध्यक्षपद शोभेचे म्हणून वापरले नाही. ‘हिराबाई भापकर अधिकाऱ्यांना थेट आदेश देऊन कार्यप्रवण करीत. दक्षतेने पाहणी करीत व काम पुरे करून घेत असत’, अशी आठवण कॉ़ भास्कर जाधव यांनी नोंदवलेली आहे. दुष्काळ निवारण समितीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून दुष्काळ निवारणासाठी त्या गावोगावी फिरल्या. राहुरी महापुराने वेढली असता, पाहणी करून हिराबार्इंनी राहुरी गाव न उठविता मुळा धरण बांधण्याच्या सूचना दिल्या. त्यांची दृरदृष्टी अशी ऐतिहासिक ठरली़ बेलापूरला प्लेगची साथ आली असता त्या साथीत लोकांच्या मदतीसाठी हिराबार्इंनी मोेठी धावपळ केली. हिराबाई कार्यासाठी खेड्यात गेल्या की, त्या थेट स्त्रियांशी संवाद साधीत. त्यांचे प्रश्न समाजावून घेत.१५ डिसेंबर १९४६ मध्ये ठाण्याला झालेल्या कोकण विभाग स्थानिक स्वराज्य परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. भाषणात त्यांनी आकडेवारीसह खेड्यातील शाळांच्या इमारती कशा असाव्यात, ब्रिटिशांमुळे उदारमतवाद मागे पडला, फासेपारधी, रामोशी यांच्यावरील गुन्हेगारीचा शिक्का बंद करावा, सर्वांना पुरेसे काम द्या, महात्मा गांधींचा संदेश- खेड्यात जा व स्वावलंबी बना, ग्रामोद्योग सुरू करणे असे विविध विषय हाताळले.लोकजागृती व स्त्री शिक्षण हे त्यांच्या आस्थेचे विषय. त्यांनी स्त्रियांचे मेळावे भरविले. मुलींना शिक्षण मिळावे व त्यांच्यासाठी वसतिगृहे व्हावीत यासाठी त्यांचे प्रयत्न विसरता येणार नाहीत. जिल्हा साक्षरता प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोकशिक्षणाचे मोठे काम उभे केले. १९४८ साली त्या जिल्हा साक्षरता मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.स्त्री शिक्षणासाठी त्या मेळावे घेऊन जागृती करीत असत. एकदा नगरला स्त्रियांच्या मेळाव्याला छोट्या इंदिरेसह कमला नेहरू आल्या होत्या. त्यांची आठवण म्हणून हिराबार्इंनी घराला ‘आनंदकुंज’ असे नाव दिले. सर्वांसाठी हे घर आनंदाचे व आधाराचे स्थान बनले.कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यातही भापकर यांचा मोठा सहभाग राहिला. १९५९ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यासाठी हिराबाई भापकर यांनी १ लाख रुपये निधी दिला होता. अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषदेचे अधिवेशन १९६६ साली नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या प्रांगणात भरले़ या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद हिराबाई भापकर यांनी भूषविले.१९७७ साली महाराष्टÑ सरकारने त्यांना ‘दलित मित्र’ हा किताब देऊन गौरव केला. यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, ‘रयत’चे संस्थापक महर्षी शिंदे यांच्यासारखी मोठी माणसे भापकरांच्या घरी येत. पण राजकारणात येऊनही हिराबार्इंनी त्यांच्या घराला राजकारणाच्या अड्ड्याचे स्वरूप येऊ दिले नाही. स्वत:च्या मुलालाही त्यांनी युवा नेता केले नाही. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर त्यांनी विश्वस्त, खजिनदार ही पदे भूषविली. शेवटी १९८४-८५ मध्ये त्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. २ डिसेंबर १९८५ रोजी हिराबार्इंनी देह ठेवला. तेव्हा बापूसाहेब साश्रु नयनांनी उद्गारले, ‘‘हिराबाई गेल्या, माझी शक्ती गेली.’’परिचयजन्म : १६ नोव्हेंबर १९०७----भूषविलेली पदे- १९४६ : ठाणे येथे झालेल्या कोकण विभाग स्थानिकस्वराज्य परिषदेच्या अध्यक्षा- १९४६ : लोकल बोर्डाच्या निवडणुकीत विजयी व जिल्हा लोकल बोर्डाच्या भारतातील पहिल्या महिला अध्यक्षा- १९४८ : जिल्हा साक्षरता प्रसारक मंडळाच्या पहिल्यासंस्थापक महिला अध्यक्षा- १९६६ : अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषदेच्या स्वागताध्यक्षा- १९७७ : महाराष्टÑ सरकारने त्यांना ‘दलित मित्र’ हाकिताब देऊन गौरव केला.- १९८४-८५ : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अध्यक्षा- मृत्यू- ०२ डिसेंबर १९८५लेखक : डॉ. भि. ना. दहातोंडे (माजी प्राचार्य व अभ्यासक)

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत