शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विळद घाटापासून मोर्चेकरी पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 00:09 IST

अहमदनगर : मराठा महा मूक मोर्चासाठी येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी नगर-मनमाड रस्ता सकाळी सात वाजेपासून गर्दीने फुलला होता

अहमदनगर : मराठा महा मूक मोर्चासाठी येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी नगर-मनमाड रस्ता सकाळी सात वाजेपासून गर्दीने फुलला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाल्याचे संयोजकांनी जाहीर केल्यानंतरही मराठा समाजाचे मोर्चेकरी विळद घाटातून नगरच्या दिशेने येतच होेते. सुमारे सात लाख लोक विळद घाटातून नगरच्या दिशेने आले असावेत असा अंदाज आहे. अकरा वाजेनंतर मनमाड रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी सुरू झाली. मोर्चात सहभागी होण्याची ओढ असल्याने तब्बल तेरा किलोमीटर मोर्चेकऱ्यांनी पायपीट करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सकाळी सात वाजेपासूनच विळद घाटातून राहुरी, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे मोर्चेकरी नगरच्या दिशेने येण्यास सुरूवात झाली. बाह्यवळण रस्त्यापासूनच पोलिसांनी वाहतूक वळविल्याने फक्त मोर्चेकऱ्यांच्या वाहनांनाच नगर शहराच्या दिशेने प्रवेश दिला जात होता. विळद घाट पास करून पुढे येताच मोर्चेकऱ्यांना विखे फौंडेशनच्यावतीने नाश्ता व पाण्याचे पाऊच देण्यात आले. सुमारे दोन लाख नाश्ता पाकिटे विखे फौंडेशनच्यावतीने मोर्चेकऱ्यांना वाटप करण्यात आले. नवनागापूर ग्रामस्थांनी एमआयडीसी परिसरात नाश्त्याची सुविधा केली होती. अप्पासाहेब सप्रे व त्यांचे सहकारी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांचे हात जोडून स्वागत करत होते. बोल्हेगाव फाटा येथेही ग्रामस्थांच्यावतीने गरम पोहे नाश्ता म्हणून वाटप केले जात होते. बोल्हेगावचा उड्डाणपूल पार केल्यानंतर वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. सावेडी नाका येथून मोर्चेकरी पायी चालले. बालिकाश्रम रस्ताही गर्दीने फुलून गेला होता.