शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात स्वाईन फ्ल्यूचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:58 IST

तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने पाचवा बळी घेतले असून शनिवारी धुमाळवाडी येथील आशा सचिन झोळेकर (वय ८८) या महिलेचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला.

अकोले / ब्राम्हणी / बोटा : तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने पाचवा बळी घेतले असून शनिवारी धुमाळवाडी येथील आशा सचिन झोळेकर (वय ८८) या महिलेचा नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यातील समशेरपूर, मोग्रस, तांभोळ, इंदोरी येथील चार रुग्णांचा स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला आहे. दरम्यान पंचायत समिती आरोग्य विभाग सतर्क झाले असून टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, योग्य पूरक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. गावातील एका डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णाला नगरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तसेच दोन स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराच्या रुग्णांवरही सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सारोळे पठार (ता. संगमनेर) येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने नाशिक येथील रूग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. सुरेश बाबूराव फटांगरे, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सारोळे पठारे येथील सुरेश फटांगरे हे आजारी होते. त्यांना तापही होता. त्यांना संगमनेर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील रूग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फटांगरे यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने झाल्याचे सांगितले. मात्र याबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. या घटनेनंतर सारोळा पठार तेथे आरोग्य पथक पाठविण्यात आले आहे. ते घरोघरी जाऊन तपासणी करत असल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले.संगमनरमध्ये दीड महिन्यात पाच बळी..४संगमनेर तालुक्यात गेल्या दीड महिन्यात स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले