शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By admin | Updated: May 27, 2016 23:23 IST

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या ५२६ व्या स्थापनादिनानिमित्त शहरात शनिवारी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या ५२६ व्या स्थापनादिनानिमित्त शहरात शनिवारी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ सावेडी येथील पटवर्धन सभागृहात प्रेस क्लब व चित्रकार योगेश हराळे यांच्या संयुक्त विद्यमाने हराळे यांच्या ऐतिहासिक वास्तुंचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ या प्रदर्शनात शहरातील ५०० वर्षातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला, चाँदबिबी महाल, शुक्लेश्वर मंदिर, नृसिंह मंदिर, अवतार मेहेरबाबा समाधी, दमडी मशीद, ह्यूम मेमोरियल चर्च, आनंदऋषीजी महाराज समाधी, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, चौथे शिवाजी महाराज यांची समाधी, रणगाडा संग्रहालय आदी ठिकाणांची माहिती दर्शविणारे चित्रप्रदर्शन होणार आहे़ सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याहस्ते होणार आहे़ रसिक ग्रुपच्यावतीने सावेडी येथील हस्त-बेहश्तबाग येथे गायक पवन नाईक यांच्या मराठी, हिंदी आणि उर्दू गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात येणार आहे़ सायंकाळी ७ वाजता ही मैफल रंगणार आहे़ तसेच रसिक ग्रुपच्यावतीने दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजता निलफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे़ मातोश्री रहेमत सुलतान स्मरणार्थ शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या विविध जाती-धर्मातील महिला कार्यकर्त्यांना ‘अहमदनगर कन्या’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ शहरातील सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे़ यावेळी अलका मोरे, रजनी जाधव, अंजली केवळ, राणी पवार, वैशाली गांधी, शेख रुबीना, तबस्सुम सय्यद, मेघना टेपाळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे़