शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईवर एफडीएची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:19 IST

गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अहमदनगर : गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेश मंडळांच्यावतीने तयार करण्यात येणारा महाप्रसाद व मिठाई दुकानदारांची तपासणी करण्यात येणार आहे़ या ठिकाणी अन्नात भेसळ आढळून आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले.गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते तर दुकानांमधूनही मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते़ या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यातून विषबाधा होण्याची शक्यता असते़ अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजविणे, अन्नाचे वाटप करणे अथवा अन्नाची विक्री करणे, यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी अन्न शिजविण्यासाठी किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस महाप्रसाद तयार करण्यासाठी व त्याचे वाटप करण्यासाठीही एफडीएकडून परवाना घेणे बंधनकारक आहे़ अशी नोंदणी नसेल, तर एफडीएला कारवाई करण्याचा अधिकार आहे. विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्नप्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जावा, हा यामागचा उद्देश आहे. अन्न, औषध प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना व विक्रीसाठी अन्न तयार करणाऱ्या दुकानदारांना नोंदणी व परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ अद्याप एकाही गणेश मंडळाने महाप्रसाद तयार करण्यासाठी परवानगी मागितलेली नाही, असे एफडीएकडून सांगण्यात आले़दुकानांचे परवाने तपासणारगणेशोत्सव काळात अनेक दुकानदार मिठाई तयार करून विक्री करतात़ शहारातील सर्वच दुकानदारांची तपासणी करून अन्नाचे नमूने घेण्यात येणार आहे़ ज्या ठिकाणी भेसळ आढळेल तसेच ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़मंडळाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार४गणेशोत्सवकाळात महाप्रसाद तयार करताना घ्यावयाची काळजी, नोंदणी, परवाना याबाबत माहिती सांगण्यासाठी अन्न, औषध प्रशासनातील अधिकारी शहरातील व जिल्ह्यातील विविध ठिकाणाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक घेणार आहेत़गणेशोत्सव काळात गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात़ या काळात अन्नातून विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ अन्न, औषध प्रशासनातील अधिकाºयांनी दुकानांची तपासणी सुरू आहे़ गणेश मंडळातील पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यात येणार आहे.- बालू ठाकूर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर