शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या हृदयासाठी मजूर पित्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 11:31 IST

श्रीगोंदा शहरातील औटीवाडी येथील रामदास हौसराव औटी यांची मुलगी रूपाली हिला हृदय व फुफ्फुसातील संसर्ग झाल्याने ती मृत्युशी झुंज देत आहे.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील औटीवाडी येथील रामदास हौसराव औटी यांची मुलगी रूपाली हिला हृदय व फुफ्फुसातील संसर्ग झाल्याने ती मृत्युशी झुंज देत आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी ३० लाखांचा खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने हे पैसे उभे करण्यासाठी माता पित्याची भटकंती सुरू आहे.श्रीगोंदा तालुक्यातील एका सहकारी साखर कारखान्यात रामदास औटी मजुरी करीत होते. गेल्यावर्षी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा, तीन मुली आहेत. दोन मुली व मुलाचा विवाह करून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र दहावी शिकलेली शेवटची व धाकटी मुलगी रूपाली (वय २५) हिच्या विवाहाचे स्वप्न बघतानाच तिला आजाराने ग्रासले.वयाच्या सहाव्या वर्षी रूपालीच्या हृदयाला बारीक छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी तिला पुण्यातील नामांकित रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी औषधांचा कोर्स केल्यास पुढे काही त्रास होणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार रोज गोळ्या व औषधोपचार सुरू आहे.दानशूरांकडून हवा तिला मदतीचा हातगेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला थकवा, चक्कर व दम लागणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यावर घरच्यांनी तिला मुंबईच्या रूग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता रूपालीचे हृदय व फुफ्फुसे तत्काळ बदलावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.यासाठी ३० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. पोटच्या गोळ्याचा जीव वाचविण्यासाठी वडील रामदास व आई सुशिला हे सैरभैर भटकंती करीत आहेत. त्यासाठी सामाजिक संस्था तसेच दानशूरांनी तिला मदतीचा हात देण्याची गरज आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा