शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोपरगावात मुस्लिम समाजाचे उपोषण, धर्मग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी

By सचिन धर्मापुरीकर | Updated: August 22, 2023 16:03 IST

कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत  गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कोळगाव थडी येथे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करावी, खोटे आरोप करून धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करावी, भडकाऊ भाषण करून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या व इतर मागण्यांसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत  गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते. हा प्रकार दि. ११ रोजी निदर्शनास आल्यानंतर कोळगावथडी येथे जमाव जमला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. त्याचदिवशी दुपारी कोळगावथडी येथील घटनेचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले. 

असंख्य नागरिक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जमले. तिथे आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्याने शुक्रवार (दि. १८ ऑगस्ट रोजी) समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवार दि. २२ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

उपोषण स्थळी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या उपद्रवींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या उपोषणाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये फिरोज पठाण, अकबर शेख, अय्याज कुरेशी, शरफुद्दीन सय्यद, अजिज शेख, नवाज कुरेशी, अन्सार शेख, वसीम चोपदार, जावेद शेख, अमजद शेख, इरफान शेख, तौसीफ मणियार, इम्रान शेख, फिरोज पठाण, इरफान कुरेशी, असलम शेख, नदीम अत्तार, जुनेद खाटीक, नदीम शेख आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर