शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:17 IST

पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुसरीकडे भारतीय किसान सभेने राज्यभर संपाचा वर्धापन दिन साजरा केला. या ऐतिहासिक घटनेची ज्योत कायमची तेवत ठेवून वेळप्रसंगी पुन्हा सरकारला घेरण्याची धग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.पुणतांबे येथे शनिवारी संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, संभाजी गमे, गणेश बनकर, रामकृष्ण डोखे, विजय धनवटे, सुधाकर जाधव यांनी गावातील शेतकरी पुतळ्याला हार घातला. दुसरीकडे संपाचा प्रमुख भाग राहिलेल्या कॉ. अजित नवले यांनीही अकोले येथे दुसरा वर्धापन साजरा केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी पुकारलेला हा पहिलाच संप होता. कामगार वर्गाप्रमाणे शेतकरीही संप करू शकतो ही भावना प्रत्यक्षात अवतरली गेली. पुणतांबे येथे १ जून २०१७ रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष यातून दिसला. शेतकºयांनी स्वत:पुरते उत्पादन घ्यावे व बाजार समित्यांमध्ये मालाची विक्री करायची नाही, असे या आंदोलनाचे सूत्र होते.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये लिटर दर निश्चित करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दूध तसेच भाजीपाल्याची विक्री करायची नाही असा निर्धार यात करण्यात आला होता.दोन वर्षानंतर या संपाचे फलित काय तसेच शेतकरी आंदोलनाला त्याने नेमकी काय दिशा दिली याबाबत ऊहापोह सध्या सुरू आहे. यानिमित्ताने संपातील काहीप्रमुख नेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. कॉ. अजित नवले म्हणाले, पुणतांबे येथील शेतकरी संप तसेच दिल्लीचा किसान मार्च यामुळे जगण्यामरण्याचे नेहमीचे प्रश्न प्रथमच चव्हाट्यावर आले. शेतकरी हा मुद्दा केंद्रस्थानी आला.राज्य सरकारने जी सुमारे २० हजार कोटी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली ते याच संपाचे यश आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिलेली कृषी सन्मान योजना, शेतमालाच्या हमी भावात केलेली वाढ ही मोठी उपलब्ध झाली. शेतकºयांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या व निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपाची आठवण जनतेत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे कॉ. नवले म्हणाले.आंदोलनाने सरकारला धडा शिकविलासंपाचे प्रमुख धनंजय धोर्डे यांनी राज्य सरकारशी त्यावेळी केलेली बोलणी चुकल्याचे मान्य केले. सरकारने आम्हाला भुलविले, चकवा दिला. मात्र आंदोलनाने सरकारला धडा शिकविला. मराठा, धनगर आरक्षण, विद्यार्थी मोर्चा यांत सर्वात परिणामकारक आंदोलन शेतकरी संपाच्या माध्यमातून झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता