शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आधार संमेलनाचा मंडप कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 15:34 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या शेतकरी आधार संमेलनाचा भव्य मंडप शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ रात्री मंडपात कुणीही नसल्याने पुढील जीवीतहानी टळल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मंडप उभारण्याचे काम केले आहे.

राहुरी: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या शेतकरी आधार संमेलनाचा भव्य मंडप शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ रात्री मंडपात कुणीही नसल्याने पुढील जीवीतहानी टळल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मंडप उभारण्याचे काम केले आहे. सोमवारी सकाळी १० वाजता पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे़ क्रीडा संकुलामध्ये गेल्या चार दिवसांपासून मंडप उभारणीचे काम सुरू होते़ मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे मंडपाच्या बल्ल्या खचल्या़ त्यामुळे ताण आल्याने मंडप जमिनीवर कोसळला़ मंडप कोसळल्याचे वृत्त समजताच अभियंता मिलिंद डोके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ अहमदनगर येथील मंडप ठेकेदाराने मंडप बांधणीचे पुन्हा काम हाती घेतले़ पुन्हा घटना घडू नये यादृष्टीने मंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे़  मोडलेले बांबू,पत्रे बाजूला करण्यात आले आहेत.स्टेजसमोर मंडप उभारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे़ कदाचित पाऊस आल्यास कार्यक्रम क्रीडा संकुलात घेण्याचीही तयारी प्रशासनाने ठरविली आहे़ किसान आधार संमेलनासाठी राज्यभरातून शेतकरी हजेरी लावणार आहेत. संमेलनात तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा व नगदी विविध ३० पिकांचे १०१ वाण, १२ भाजीपाला वाण, १४ भाजीपाला पिकांचे २८ वाणांचे प्रात्यक्षिक शेतकºयांना पाहता येतील, असे कुलगुरू डॉ़ के. पी. विश्वनाथा यांनी सांगितले़१०० दालनांमध्ये विविध विषयावर प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतक-यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे़ २९ सप्टेंबर रोजी संमेलनाची सांगता होणार आहे़

  • विद्यापीठाच्या प्रांगणात मंडप उभारण्याचे काम सुरू होते़ पावसामुळे मंडप खचल्यामुळे कोसळला़ कोणत्याही प्रकारे जीवीतहानी झालेली नाही़ पर्यायी मंडप उभारण्याचे काम सुरू असून रविवारी रात्री दहा वाजेपर्र्यंत मंडपाचे काम पूर्ण होणार आहे़ जुना मंडप काढून टाकण्यात आला असून टुरूंगाईन पध्दतीने नव्याने मंडप उभारण्यात आला आहे़  -मिलिंद डोके, अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.