शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकरी गाळात : भीमा नदीकाठावरील शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:36 IST

कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.

सिद्धटेक : कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.भीमा नदीवरील उजनी जलाशय यावर्षी १०९ टक्के भरूनही जलसंपदा विभागाच्या नियोजनाअभावी पाणी साठा हा जलाशय आता रिकामा झाला आहे. पाणी संपत आल्याने पिकांना शेवटचे पाणी देण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. त्यासाठी त्यांना नदीतील गाळ बाजूला करून पाईप टाकून विद्युतपंप पुढे घ्यावे लागत आहेत. पाण्याबरोबर गाळ, शंख शिंपले आल्याने ते विद्युत पंपाच्या फुटवॉलला बसत असल्याने ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना या गाळमिश्रीत पाण्यात बसूनच राहिले तरच, विद्युत पंप सुरळीत चालतात.

हाता तोंडला आलेले पीक एका पाण्यासाठी हातचे जायची वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या इतिहासात पूर्ण भरूनहीे ते पूर्णपणे रिकामे होण्याची ही पहिली वेळ आहे. पाणी कमी होत असल्याने विद्युतपंप सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे लोकसभा निवडणूकरूपी लोकशाहीच्या मोठ्या सणात आम्हा शेतकºयांना आनंदाने सहभागी होता येत नाही, याची खंत आहे. -विठ्ठल जगताप, शेतकरी भांबोरा.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर