शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:29 IST

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोपरगाव बाजार समितीभाव पाडल्याचा व्यापा-यांवर आरोप

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.शनिवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील शेतकºयांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. मात्र १ हजार ७०० रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतकºयांनी २ हजार ५०० चा भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापाºयांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर उपस्थित होते.कारवाई केली जाईल. लिलावात चुकीचे वागणा-यांवर कारवाई केली जाईल. व्यापा-यांनी सुध्दा शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतक-यांनी व्यापा-यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर ३-४ व्यापा-यांना नोटिसा काढण्यात येतील. चुकीचे वागणाया शेतक-यांना समज देण्यात येईल.-नानासाहेब गव्हाणे, उपसभापती.

शाब्दिक चकमक

कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतकºयांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये निघाले होते. लिलावास १५ पैकी १० व्यापारी हजर होते.-परसराम सिनगर, सचिव.कठोर कारवाई करावीज्याचा माल नाही, त्याने व्यापा-याला शिवीगाळ केली. वास्तवत: ज्याचा माल आहे, त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापा-यांसह शेतक-यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, पुढील लिलाव होणार नाहीत.-अजित लोहाडे, व्यापारी.