शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीभान येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको : दुष्काळी यादीत समावेशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:41 IST

तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व सरकारने नव्याने सर्वेक्षण करून दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

टाकळीभान : तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व सरकारने नव्याने सर्वेक्षण करून दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. मंडळाधिकारी बाबासाहेब जाधव यांनी निवेदन स्वीकारून सरकार दरबारी भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तलाठी आकांक्षा ढोके उपस्थित होत्या. माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले, मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी व टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. त्यातच हक्काचे पाटपाणी समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरिपाचे व रब्बीचे पिक वाया गेलेले आहे. भीषण पाणीटंचाई आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला असून श्रीरामपूरवर मात्र अन्याय झाला आहे. तालुक्याच्या आमदारांनी त्यासाठी अजिबात प्रयत्न केला नाही, असा आरोप पवार यांनी केला.यावेळी अविनाश लोखंडे, नवाज शेख, राहूल पटारे, नारायण काळे, राजेंद्र कोकणे, बापूसाहेब शिंदे, उपसरपंच पाराजी पटारे, चित्रसेन रणनवरे यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे दादासाहेब कोकणे, भाऊसाहेब पवार, शिवाजीराव धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे, रिपाइंचे आबासाहेब रणनवरे राजेंद्र रणनवरे, शंकर शिंदे, भारत भवार, आप्पासाहेब रणनवरे, विलास दाभाडे, गजानन कोकणे, अप्पासाहेब कापसे, प्रकाश दाभाडे, अक्षय कोकणे आदी सहभागी झाले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर