शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.

नेवासा : मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, वांळुजपोई- अंमळनेर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणाचे पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी मुळा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पानेगाव-मांजरी येथील नदीपात्रात मंगळवारपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु होते. मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, पांजुळपोई, अंमळनेर हे तीन बंधारे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे. याच बंधाऱ्यावर या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मुळा धरणातून या तीनही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने आज परिस्थिती भयानक व दुष्काळसदृश झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या आहेत. तीन वर्षापासून बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मुळा धरणात २० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याने मुळा नदीवरील तीनही बंधारे भरणे गरजेचे होते. येथील सिंचन प्रश्न या बंधाऱ्यावरच अवलंबून असल्याने जनावरांसह पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मुळा धरणातून वर्षातून बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.उपोषणाचे नेतृत्व नेवासा तालुक्यातील शिरेगावचे सरपंच किरण जाधव, पानेगावचे उपसरपंच डॉ.जयवंत गुडघे, मुळाथडी पाणी हक्क आरक्षण कृती समितीचे उपाध्यक्ष विलास सैंदोरे, नानासाहेब जुंधारे करीत आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आ़ भानुदास मुरकुटे, नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, उत्तमराव म्हसे, बाळासाहेब पवार यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. (तालुका प्रतिनिधी)