शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दूधदरवाढीसाठी शेतक-यांनी हैदराबाद मार्ग अडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:47 IST

दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्गावर आनंदवाडी जवळच्या लोणी फाटा (ता. जामखेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व दूध उत्पादक शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

खर्डा : दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्गावर आनंदवाडी जवळच्या लोणी फाटा (ता. जामखेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व दूध उत्पादक शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सतत शेतक-यांवर अन्याय करणाºया फसव्या सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करावे लागत असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, रास्ता रोको आंदोलन सुरू होण्यापूर्वी बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन आंदोलनस्थळी उपस्थित होते. परंतु शेतक-यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शेतकरी आंदोलन करतो, तेव्हा प्रशासनाचा माणूस लवकर येत नाही. सरकारला शेतकºयांच्या मागण्यांचे काही देणे घेणे नाही.दीड ते दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, अमित जाधव, शेतकरी संघटनेचे भीमराव लेंडे आदी मान्यवरांची आंदोलकांसमोर भाषणे झाली.रास्ता रोको आंदोलनात नायगाव, नाहुली, दरडवाडी, आनंदवाडी, वाकी, लोणीसह जामखेड तालुक्यातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकाºयांची उदासीनताप्रशासकीय अधिकाºयांची आंदोलनाबाबत उदासीनता------------------प्रशासकीय अधिकाºयांची उदासीनतायावेळी उपस्थित नेते व शेतक-यांनी पेट्रोल-डिझेल इंधनाची वाढती दरवाढ कमी करावी, प्रत्येक शेतमालाला हमीभाव, दुधाला प्रति लिटर ४० रूपये दर द्यावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयाला कुटुंबासह पेन्शन द्यावी, शेतीचा सातबारा संपूर्ण कोरा करून कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जामखेड तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी एस. आर. कोळी, जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांना देण्यात आले. यावेळी सरकारी अधिकारी, प्रतिनिधी येण्यास उशीर झाल्यामुळे उपस्थित नेते, पदाधिकारी व शेतकºयांनी प्रशासकीय अधिकाºयांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर