शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 20:46 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन केले आहे. या किसान आधार संमेलनात शेतक-यांसाठी कृषी प्रदर्शन, विविध पिकांचे प्रात्यक्षिके, पशुप्रदर्शन आणि विविध कृषी विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या किसान आधार संमेलनातील पीक प्रात्यक्षिकांमध्ये तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा आणि नगदी पिकांमधील विविध ३० पिकांचे १०१ वाण, १४ भाजीपाला पिकांचे २८ वाणांचे प्रात्यक्षिके बघता येणार आहे. या व्यतिरिक्त गायी, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्याच्या विविध जाती, तसेच कृषी अवजारे शेतकºयांना पाहण्यास मिळणार आहे. प्रदर्शनस्थळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना, विविध खासगी कंपन्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांना एकाच दालनाखाली पाहण्यास मिळणार आहे. याचबरोबर सिंचन प्रणाली, निचरा पद्धती, माती परीक्षण प्रात्यक्षिके, एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालन, जिवाणू खते, जैविक कीड नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादी कृषी तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची संधी यानिमित्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रत्येक दिवशी विविध विषयांवर कृषी शास्त्रज्ञांचे आणि प्रगतिशील शेतक-यांचे व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.  किसान आधार संमेलनास राज्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी भेट देऊन तंत्रज्ञान आत्मसात करावे, तसेच शास्त्रज्ञ व प्रगतिशील शेतकºयांशी सुसंवाद साधावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा यांनी केले. हे किसान आधार संमेलन शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या किसान आधार संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे यांनी दिली.