शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:10 IST

सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़

सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़ धोंडे सर म्हटले की सारा यंत्र आणि कंटूर मार्कर यांचे पेटंट असलेला कृषी शास्त्रज्ञ डोळ्यासमोर उभा राहतो़ पुण्यात दहा बाय दहाच्या खोलीत राहून शेतकºयांच्या सुखी जीवनासाठी धडपडणाºया या जागतिक कीर्तिच्या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन मंगळवारी (३० आॅक्टोबर) रोजी नुकताच पार पडला.मोहन धोंडे यांनी ३५ वर्षांपूर्वी धोंडे सरांची ओळख करून दिली़ धोंडे सरांनी डोंगरावर कंटुर मार्करचा शोध लावल्याचे सांगितले होते़ हजारो एकरावर कंटुर मार्करच्या सहाय्याने सलग चर खणून उघड्या बोडख्या डोंगरांना हिरवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते़ यासंदर्भात अधिकारी व स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देऊन कंटुर मार्कर किती महत्वाचे आहे याची प्रचिती करून दिली होती़धोंडे सरांचे कंटुर केवळ महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित राहिले नाही़ उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यात कंटूर फोफावले़ धोंडे सर सांगत, कंटुर म्हणजे डोंगर टेकड्यांवर सम पातळीत सलग घेतलेले चऱ अगणित चर खोदून डोंगरावर कित्येक अब्ज झाडे उभी राहिली़ धोंडे सरांच्या संशोधनातून सलग चराच्या माध्यमातून आजही कोट्यवधी झाडे हवेच्या झोकात डोलत आहेत़शेतकºयांची कामे सुलभ व्हावी म्हणून धोंडे सरांनी सारा यंत्राचा शोध लावला़ कंटूर मार्करचा वापर करून शेतकरी अथवा विद्यार्थी जमिनीची उंची मोजू लागला़ सरांच्या उपकरणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही घेतली़ नाईक यांनी धोंडे सरांशी प्रत्यक्ष संपर्क केला़ समचर पध्दती समजून घेतली़ सडे गावासारख्या खेड्यातून आलेला शेतकºयाचा मुलगा एवढे मोठे काम करू शकतो हे पाहून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही टाकली़कंटुर मार्कर पेटंट विकून धोंडे सरांना मोठी रक्कमही मिळाली असती़ मात्र त्यांना प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात ते वापरायचे होते़ मात्र उद्योगाची कास धरलेल्या धोंडे सरांना लघुउद्योग फायद्यात आणता आलाच नाही़ धोंडे सरांच्या संशोधनाची दखल घेत पुण्याच्या मराठा चेंबरने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले़ पाणी अडविण्यासाठी डोंगराचा माथा ते पायथा असे नियोजन केले पाहिजे हे धोंडे सर समजून सांगत़ शेती फायदेशीर ठरावी म्हणून पाण्याचे गणित मांडीत असत़ पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग केला तर दुष्काळ पडणार नाही, असे धोंडे सर ठामपणे सांगत़भाऊसाहेब येवले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर