शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; राजुरी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:46 IST

शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे.

बाभळेश्वर : शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावाच्या शिवेला पाण्याच्या तळ्याजवळ काही लोकवस्ती आहे. येथे काही शेतक-यांची शेती आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बाभळेश्वर येथील युवक महेश सुधाकर बेंद्रे याची गट नंबर २११ मध्ये शेती आहे. यामध्ये गहू व मकाचे पीक असल्यामुळे महेश शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात असणा-या मका पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरण्याचे काम चालू असताना मोटारीचे पाणी कमी पडले म्हणून म्हणून तो आपल्या गव्हाच्या शेतामधून मोटार चालू करण्यासाठी जात विहिरीकडे असताना मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. प्रथम या बिबट्याने महेशच्या पायाला पकडले. महेशने कशीतरी त्याच्या तावडीतून्न सुटका केली. परंतु नंतर बिबट्याने परत त्याच्या मानेजवळ पकडण्याचा प्रयत्न केला. महेशने त्याच्याशी प्रतिकार करुन कशीबशी सुटका करून घेतली. यानंतर महेशने आरडाओरड करून जवळच्या वस्तीकडे धाव घेतली. येथे शेतकरी गोकुळ गोरे व अन्य शेतक-यांना त्याने माझ्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे सांगितले. यानंतर वस्तीतील शेतकरी व महिलांनी त्याला धीर देऊन लोणी येथील सरकारी रूग्णालयात उपचारासाठी पाठिवले. या उपचारानंतर त्याला नगर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. महेश बेंद्रे यांच्या मानेला व हाताला बिबट्याने धरल्याच्या खुणा दिसत आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्या