शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर देशांतील भाविक होतात साईचरणी लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 03:39 IST

‘चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी माझ्या माणसांना साता-समुद्रापलीकडून ओढून आणीन’ हे साईबाबांनी वर्तवलेलं वाक्य तंतोतंत खरे ठरले़

प्रमोद आहेर शिर्डी : ‘चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी माझ्या माणसांना साता-समुद्रापलीकडून ओढून आणीन’ हे साईबाबांनी वर्तवलेलं वाक्य तंतोतंत खरे ठरले़ सध्या भारतासह ७० देशांतील भाविक शिर्डीतील साईदरबारी हजेरी लावत असून, जगभरात पाचशेहून अधिक मंदिरे व शेकडो प्रार्थना केंद्रे आहेत़लंडनमध्ये २३ जुलै १९६५ रोजी गोल्डर्स ग्रीन भागात बनारसे आजींनी आपल्या घरातील खोलीचे साईमंदिरात रुपांतर करून विदेशात पहिल्यांदा श्रीसाईबाबा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली़ विदेशात मंदिर बांधणीचे नियम कडक असूनही लंडन शहरात चार मोठी मंदिरे व अनेक प्रार्थना केंद्रे आहेत, असे लंडन येथील साईभक्त प्रतिक कोठारी यांनी सांगितले़ अमेरिकेत ७५ पेक्षा अधिक मंदिरे असून मेनियापुली येथे ४२ एकरात साईमंदिर उभारले जात आहे़ न्यूझीलंडमधील आॅकलंड शहरात भास्कर रेड्डी यांनी २५ कोटी कर्ज घेऊन ७ वर्षांपूर्वी बांधलेले साईमंदिर आता कर्जमुक्त झाले आहे़ तीन पिढ्यांपूर्वी मलेशियाला गेलेल्या कन्नन यांची मलेशियात २६ योगाकेंद्रे आहेत़ तेथे साईबाबांची प्रतिमापूजन व मराठीतील आरतीने दिवसाची सुरूवात होते़ गेल्या वर्षी जगभरातील मंदिरांनी साईसमाधी शताब्दी साजरी केली़ साईसंस्थानच्या मंदिर परिषदेला ४० विदेशी मंदिर प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचे संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी सांगितले़वर्षभरात शिर्डीला सोळा हजारांहून अधिक विदेशी व अनिवासी भारतीयांनी भेट दिली़ संस्थानला वर्षाकाठी सुमारे १८ कोटी रूपयांचे तसेच ७० देशांचे विदेशी चलन देणगीतून मिळते, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी सांगितले़